मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होऊ शकते : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या ठिकाणी मतदान यंत्र ठेवण्यात आले आहेत. त्या परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरवर जॅमर बसवण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम टेम्परिंग होऊ शकते त्यामुळे या परिसरातील मोबाईल टॉवरवर निवडणूक आयोगाने जॅमर बसवावेत अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, ज्या ठिकाणी मतदान यंत्र ठेवण्यात आले आहेत. त्या परिसरातील मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम मशिन टेम्परिंग होऊ शकतात. त्यामुळे मतदान यंत्र ठेवलेल्या परिसरातील मोबाईल टॉवरवर जॅमर लावावा यासाठी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आपल्याला असलेल्या शंकाबद्दल निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांच्याकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण यांनी देखील आयोगाच्या प्रक्रियेबद्दल शंका व्यक्त केली असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. पत्रकार परिषदेदरम्यान चव्हाण यांनी ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करण्याची मागणी केली.