स्ट्राँग रुम ऐवजी हॉटेलमध्ये सापडल्या इव्हीएम, प्रचंड खळबळ

मुजफ्फरपुर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीतील ५ व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली. या वेळी बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये मतदान प्रक्रिया संपल्यानंतर व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीन चक्क हॉटेलमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनीही प्रचंड गोंधळ केला असून एसडीओ कुंदन कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर हलगर्जीपणाने इव्हीएम हाताळल्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे सेक्टर मॅजिस्ट्रेट यांनी सांगितले आहे.

काल मतदान संपल्यानंतर १ कंट्रोल युनीट, २ व्हिव्ही पॅट मशीन आणि दोन बॅलेट युनीट हॉटेलमध्ये सापडले. यावर जिल्हाधिकारी आलोक रंजन धोष यांनी सांगितले की, क्षेत्रिय अधिकाऱ्याला काही राखीव मशीन्स दिल्या गेल्या होत्या. त्यातील काही बदलल्यानंतर त्यांनी खराब मशीन आपल्यासोबत घेतल्या आहेत. त्या बददल्यानंतर त्यांनी २ बॅलटींग युनीट्स, १ कंट्रोल युनीट, २ व्हिव्हीपॅट मशीन्स आपल्या कारमध्ये नेल्या आहेत. दरम्यान बदललेल्या मशीन आपल्या सोबत घेऊन जाण्याची गरज नव्हती. त्यामुळे ही गंभीर चूक असल्याने त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे.

Loading...
You might also like