धक्कादायक…जन्मदात्या आईने फेकून दिलेल्या ३ तासांच्या अर्भकाचे कुत्र्यांमुळे ‘असे’ वाचले प्राण !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर येथील एक घटना समोर आली आहे जे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. येथील एका महिलेने आपल्या नुकत्याच जन्म झालेल्या आपल्या अवघ्या तीन तासांच्या अर्भकास शेतात फेकून दिले मात्र परिसरातील कुत्र्यांमुळे त्या बाळाचे प्राण वाचले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच या बाबतीत म्हणावे लागेल.

जन्म घेतल्यानंतर हे जग काय हे कळायच्या आतच जन्मीदात्री बाळाला शेतात फेकून निघून गेली. मरणासन्न अवस्थेत असलेल्या या अर्भकाचे संपूर्ण अंग मातीने माखले होते. परिसरात असलेल्या कुत्र्यांनी त्याला पाहिले आणि मोठ्याने भुंकन्यास सुरूवात केली. आजूबाजूच्या काही तरुणांनी कुत्र्याचे भुंकणे ऐकून घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना हे अर्भक आढळून आले. तरुणांना हा नवजात मुलगा आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिस पाटील फारुख पटेल व तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष अख्तर सय्यद यांना घटनेची माहिती दिली. रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलिसांच्या वाहनातूनच प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळाला दाखल केले होते.

बाळाची प्रकृती उत्तम :
प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार पार पडल्यानंतर आता त्या बाळावर लातूर येथील शासकीय आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. बाळाच्या प्रकृती उत्तम असल्याची माहिती वैधकीय आधिकाऱ्यांनी दिली. बाळ सापडण्याच्या तीन ते चार तासांपूर्वी त्याचा जन्म झालेला असावा अशी माहिती देखील त्यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like