‘इविंग सारकोमा’ नेमकं काय आहे ? जाणून घ्या याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

काय आहे इविंग सारकोमा ?

हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो हाडांना प्रभावित करतो. ऑस्टियोसारकोमा नंतर हा सर्वात सामान्यपणे उद्भवणारा हाडांचा कर्करोग आहे. बहुतांश लहान आणि किशोरवयीन मुले या रोगानं बाधित होतात.

काय आहेत याची लक्षणं ?

– वेदना आणि द्रव संचय हे मुख्य लक्षण
– काही कारणाशिवाय वाढलेलं शरीराचं तापमान
– थकल्यासरखं वाटणं
– त्वचेखाली नोड्युल किंवा गळकुंड (विशेष करून काख, हातपाय छाती किंवा पोटाच्या भागात जसे की पेल्विक)

काय आहेत याची कारणं ?

याचं वास्तविक कारण अज्ञात आहे. परंतु ते अनुवांशिकरित्या प्रसारीत होते. हा एक अधिग्रहित अनुवांशिक दोष आहे. यात समाविष्ट असलेल्या दोन जीन्समध्ये या आहेत.

– 22 व्या क्रमांकाच्या गुणसुत्रावर किंवा क्रोमोझोमवर इडब्ल्यूएसआर 1 (EWSR1)
– 11 व्या क्रमांकाच्या गुणसुत्रावर एफएलआय 1 (FLI1)

काय आहेत यावरील उपचार ?

– किमोथेरपी
– रेडिएशन थेरपी
– ऑपरेशन
– जर कर्करोगाची कायमच पुनरावृत्ती होत असेल तर स्टेम सेल थेरपीचा वापर करणं सुचवलं जातं.
– मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर
– अँटीजन लक्षित इम्युनोथेरपी