ews विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमाला घ्यावा लागणार खुल्या प्रवर्गातून प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी आर्थिक मागास प्रवर्गाच्या १० टक्के आरक्षणाला यंदा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे.

त्यासाठी खुल्या प्रवर्गातील गरीब आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची मुदत ३१ मे ऐवजी ४ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी धक्का दिला. पदव्यूत्तर वैद्यकिय प्रवेशात खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना दिलेल्या १० टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी स्थगिती दिली. कायदा बनण्याआधीच प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने नव्या आऱक्षणानुसार जागा वाढविण्याच्या निकषांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आरक्षणाला स्थगिती दिली.