देवेंद्र फडणवीसांनी टाळली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर राज्यातील बड्या नेत्यांसह, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. मात्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. मात्र, त्यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक इथं असणाऱ्या उद्धव ठाकरे यांची भेट न घेता शिवतीर्थावरून निघून गेले.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून बाळासाहेबांना अभिवादन केले होते. ते शिवतीर्थावर येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर दीडच्या सुमारास ते शिवतीर्थावर आले. त्यांना बाळासाहेबांना अभिवादन केले. दरम्यान, शिवसैनिकांनी मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन, आवजा कुणाचा… शिवसेनेचा अशी घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी आपल्या मनातील राग घोषणाबाजीतून व्यक्त केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंकजा मुंडे, विनोद तावडे, भाई गिरकर, भाई जगताप उपस्थित होते.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीस यांनी बाळासाहेबांचा जुन्या आठवणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये स्वाभिमान आणि हिदूत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश बाळासाहेबांनी दिलाय. भाजप आणि शिवसेना युतीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिदुत्वाची आठवण करुन दिल्याचे दिसून येतंय.

Visit : Policenama.com