देवेंद्र फडणवीसांनी दिल्या उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाल्यानंतर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा कळवल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावरुन सामान हलवले जात आहे. आता नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी शासकीय वर्षा बंगला रिकामा केला जात आहे.

पंतप्रधान मोदींनी देखील दिल्या शुभेच्छा
राज्याला आज नवे मुख्यमंत्री मिळाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ट्वीट करत शुभेच्छा कळवल्या.

पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत ट्विट केले की महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा. मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करतील.

Visit : Policenama.com