प्रकल्पांना स्थगिती देणं हे दुर्दैवं, माजी मुख्यमंत्र्यांची सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सरकारवर भाजपकडून टीकास्त्र डागले जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. नव्या महाविकासआघाडीच्या सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. यावरच बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरले. फडणवीस म्हणाले की राज्यातील अनेक प्रकल्पांना सरकार स्थापन झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील या प्रकल्पांना स्थगिती देणं म्हणजे दुर्दैव आहे.

फडणवीसांनी सरकारच्या खातेवाटपावर देखील शरसंधान साधले. फडणवीस म्हणाले की राज्यात हे सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले आहेत, तरी देखील या सरकारचे खाते वाटप झालेले नाहीत. कोणतंही काम झालं नाही. राज्यात इतके दिवस उलटून गेले तरी कोणतेही खातेवाटप नाही. कामे नाही असे म्हणत त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

अजूनही खाते वाटप झालेले नाही. सरकारने तात्काळ खाते वाटप करावे असे ही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली.

Visit : Policenama.com 

 

You might also like