फडणवीसांच्या विश्वासू आमदारानं घेतली अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेची चर्चा सुरू असताना बंड करत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात सत्ता स्थापन केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपचे बडे नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कारण प्रसाद लाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासून मानले जातात. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पुण्यातील सर्किट हाऊसवर अजित पवार आणि प्रसाद लाड यांची भेट झाली होती. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी याबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, “काही सार्वजनिक कामानिमित्त लाड भेटायला आले होते. यात काहीही वेगळं नाही. अशा भेटी होत असतात.” असंही ते म्हणाले.

अजितदादांचा धडाका सुरूच
अजित पवारांनी आज पुण्यात विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी मेट्रोसंदर्भात अनेक मतहत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. मेट्रोचे प्रस्तावित 6 कॉरिडॉर टप्प्या टप्प्याने सुरू करण्याऐवजी सगळ्या कॉरिडॉरचं काम एकाचवेळी सुरू करण्यासाठी डीपीआर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पुणे मेट्रोचं नाव बदलून पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो असं करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यापासून अजित पवार यांनी बैठका आणि निर्णयांचा धडाकाच लावला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/