राणेंनी ‘चिखल’ फेकला मी ‘डोके’ फोडेन ; काँग्रेसच्या माजी आमदाराचा इशारा

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन – कणकवलीतील महामार्गाच्या निकृष्ठ कामामुळे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कणकवलीकर त्रस्त झाले आहेत. यामुळेच नितेश राणे यांनी महामार्ग उपअभियंत्याच्या अंगावर चिखलफेक केली. हे प्रकरण ताजे असतानाचा काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत यांनी आज ठेकेदाराला धमकी दिली आहे. नितेश राणेंनी चिखल फेकला मी तर अधिकाऱ्यांची डोकेचं फोडेन असे त्यांनी म्हटले आहे.

विजय सावंत यांच्या कणकवलीतील रामेश्वर प्लाझा या संकुलनासमोरील नाला ठेकेदाराने बुजवला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी संकूल आणि परिसरात भरत आहे. याबाबत आज सावंत आणि महामार्ग कनिष्ठ अभियंत्यांनी पोलीस बंदोबस्तात पहाणी केली. त्यावेळी माजी आमदार सावंत यांनी पोलिसांसमोर अधिकाऱ्यांचे डोके फोडण्याची भाषा करत इशारा दिला. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

नितेश राणे यांच्या आंदोलनाला सावंत यांनी पाठिंबा दिला आहे. येत्या तीन दिवसांमध्ये नाला सुधारून देतो असे आश्वासन ठेकेदाराने सावंत यांना दिला आहे. जर तीन दिवसात ठेकेदाराने नाला दुरुस्त करून दिला नाही तर कणकवलीमध्ये महामार्गाचे आंदोलन चिघळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

 

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

 कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !