माजी शिक्षण विस्तार संचालकाकडे दीड कोटींची बेकायदा मालमत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे विस्तार शिक्षण व साधन सामुग्री संचालक राहिलेल्या सुरेश नामदेवराव अंबुलगेकर (वय ६०) यांच्याकडे तब्बल दीड कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आढळून आली. ज्या मालमत्तेचा कोणताही स्त्रोत ते सांगू शकले नाही. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या विरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियमानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्यासह पत्नी व मुला विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अंबुलगेकर यांच्या विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर पोलिसांनी छापे घातले असून त्याची छाननी करण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11cb320f-c2d2-11e8-a2a0-5950db34c2c5′]

मंगाराणी सुरेश अंबुलगेकर (वय ५६) आणि नितीन सुरेश अंबुलगेकर (वय ३०,रा. मु. पो. मुखेड, जि. नांदेड) अशी त्यांच्या पत्नी व मुलाचे नाव आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुहास नाडगौडा यांनी या प्रकरणाची चौकशी केली असून बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B07C7D4QKF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e85dd08-c2d2-11e8-a6a7-4f7e0b5e4f67′]

सुरेश अंबुलगेकर यांने सध्या निवृत्त झाले आहेत. पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत ते विस्तार शिक्षण व साधन सामुग्री संचालक होते. त्यांच्याविषयी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार अगोदर गुप्त चौकशी करण्यात आली. त्यात तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर त्यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघड चौकशी सुरु केली. त्यांना त्यांच्या शासकीय सेवा काळातील जुलै १९८० ते जून २०१४ या काळात आपल्या शासकीय सेवा काळात मिळालेला पगार व इतर भत्ते यांचे एकूण उत्पन्न आणि त्यांच्याकडे असलेली मालमत्ता यांचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अनेकदा सूचना करुनही त्यांना आपल्याकडील १ कोटी ५५ लाख १५ हजार ४२६ रुपयांच्या मालमत्तेचे स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे ही सर्व मालमत्ता त्यांनी शासकीय सेवा काळात भष्ट्राचार करुन मिळविली असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ही मालमत्ता भष्ट्राचारातून मिळविली असल्याचे माहिती असल्याने व त्यात त्यांचा सहभाग असल्याने पत्नी मंगाराणी आणि मुलगा नितीन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला कंडक्टरच्या पतीकडून लाच घेणाऱ्या डेपो मॅनेजरला अटक

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या पुण्यासह मुखेड व इतर ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर छापे घालण्यात आली. या छाप्यांमध्ये मालमत्तेसंबंधी आणखी काही कागदपत्रे सापडली असून त्याची छाननी करण्यात येत आहे. अंबुलगेकर यांची नांदेड, औरंगाबाद, लातूर आणि पुणे येथे मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले असून त्यात फ्लॅट आणि भुखंड असल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहेत.