भारतीय लष्करासाठी IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी बनवलं ड्रोन, 130 कोटींचा करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय औद्योगिक संस्थेच्या ( IIT बॉम्बे) तीन माजी विद्यार्थ्यांनी आणि प्रमुख इंजिनिअरिंग संस्थांनी मिळून बनलेल्या एका कंपनीने (EX-IITians, company) भारतीय सैन्यासोबत 130 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. आयडिया फोर्जे टेक्नॉलॉजी या नावाच्या कंपनीची स्थापना 2007 मध्ये झाली होती.

अंकित मेहता, राहुल सिंह, अशिष भट्ट या तिघांनी ही कंपनी उभारली आहे. आयआयटी बॉम्बेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे. SINE आणि अंकित, राहुल, आणि आशिष यांना आमच्या शुभेच्छा, हे खरच प्रशवंसनीय आहे. की त्यांना गेल्या वर्षी एलूमनी अचिव्हर्स वार्डसाठी निवडण्यात आले होते, असं फेसबुक पेजवर लिहण्यात आले आहे.

आपल्या वेबसाईटवर कंपनीने म्हटले आहे की, भारतीय सैन्याला आयडिया फोर्जेस स्विच युएव्ही चे मानव रहित एरियस व्हेईकल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ऑपरेशनल संबंधित सर्व मापदंड पूर्ण करण्याची क्षमता असल्याने आयडिया फोर्ज करार करण्यात आला आहे. स्विच युएव्ही एक एफएक्सड विंग वर्टीकल टेकऑफ ऑर लँडिंग क्राफ्ट आहे. ज्याला दिवसरात्र देखरेख आणि कठीण वातावरणात तैनात केले जाऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे उपकरण मेंन पोर्टेबल आहे आणि आपल्या श्रेणीच्या कोणत्याही युएव्हीशी तुलना करता अत्याधुनिक आहे, तसेच आपल्या टार्गेटवर खूप वेळ नजर ठेवू शकते.