बंगाल : BJP चे उमेदवार आणि माजी क्रिकेटपट्टू अशोक डिंडा यांच्यावर हल्ला; प्रचारादरम्यान गाडीची तोडफोड

पोलिसनामा ऑनलाईन – बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी संपला, पण त्या दरम्यान राजकीय नेते आणि माजी क्रिकेटपट्टू अशोक डिंडा यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. हा हल्ला तेव्हा झाला जेव्हा ते निवडणुकीचा प्रचार करत होते. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अशोक डिंडा भाजपच्या तिकिटावर मोयना येथून निवडणूक लढवत आहेत.

प्रचारादरम्यान अशोक डिंडा यांच्या गाडीची तोडफोड झाली. अशोक डिंडा यांना थोडी जखम झाली आहे. डिंडा यांनी या हल्ल्याला घेऊन एक व्हिडीओ आणि फोटो ट्विटरवर टाकला आहे. डिंडा यांनी आरोप केला आहे की त्यांच्या कारवर आणि त्यांच्यावर विटांनी हल्ला करण्यात आला आहे.

अशोक डिंडा यांनी ट्विट करून सांगितले की तृणमूलच्या लोकांनी आज संध्याकाळी ४ वाजता बीडीओ कार्यालयाजवळ त्यांच्यावर हल्ला केला.

शुभेंदु यांच्या भावाच्या गाडीवरही हल्ला
मतदानाच्या पहिल्या टप्प्यात हुगळीच्या तारकेश्वर विधानसभा अंतर्गत जि.प. ३३ क्षेत्रातील भाजपा सरचिटणीस सुमन मंडल यांचा विनयभंग आणि मारहाण करण्याची घटना घडली. सुमन यांनी तृणमूलच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. जखमी झालेल्या भाजप नेत्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शेकडो भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान हिंसाचाराची ही पहिली घटना नाही. यापूर्वी निवडणुकीच्या दिवशीही हिंसाचार आणि मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मतदानाच्या वेळी पूर्व मेदिनीपूर जिल्याच्या कांथी विधानसभेत भाजप नेते आणि शुभेंदू अधिकारी यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर हल्ला केला.

धर्मेंद्र प्रधान यांच्या निवडणूक रैलीवर हल्ला
त्यावेळी BJP नेते सौमेंदू अधिकारी गाडीमध्ये नव्हते, त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. सौमेंदू अधिकारी यांनी हल्ल्यासाठी तृणमूल काँग्रेसवर आरोप लावला आहे. सौमेंदू अधिकारी यांनी TMC नेत्यांवर आरोप करत म्हणाले की TMC ब्लॉक अध्यक्ष राम गोविंद दास आणि त्याच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली तीन मतदान केंद्रावर निवडणुकीत फेरफार केला जात होता. माझ्या येण्याने त्यांच्या बेकायदेशीर कार्यात अडथळा निर्माण झाला, त्यामुळे त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला आणि माझ्या ड्राइव्हरला मारले.

१८ मार्चला निवडणूक प्रचारादरम्यान हाय प्रोफाइल सीट नंदीग्राम मध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रचार रॅलीवर हल्ला झाला. हा हल्ला तृणमूल काँग्रेसवच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप लावला गेला आहे. या हल्ल्यात बीजेपीचा कार्यकर्ता जखमी झाला आहे.

निवडणुक प्रचारादरम्यान हल्ल्यांच्या अनेक छोट्या घटना उघडकीस आल्या आहेत. हल्ल्याचा आरोप भाजपा आणि टीएमसी एकमेकांवर करत आहेत.