माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार CBI समोर गैरहजर, पत्र लिहून दिले ‘हे’ कारण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकत्ताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयने समन्स काढून आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने आदेश देऊनही राजीव कुमार यांनी सीबीआयला वैयक्तीक कारणामुळे हजर राहू शकत नसल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. सीबीआयचे एक पथक काल त्यांच्या घरी गेले होते. मात्र, या ठिकाणी राजीव कुमार घरी उपस्थित नव्हते.

राजीव कुमार हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय आहेत. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात सीबीआय राजीव कुमार यांची चौकशी करणार आहे. १९८९ बॅचचे आयपीएस असलेले राजीव कुमार यांच्यावर चिटफंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. याचा तपास सीबीआय करत आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजीव कुमार यांनी सीबीआयला पत्र लिहून चौकशीसाठी हजर होण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. तसेच तीन दिवस सुट्टीवर असल्याने आपण हजर राहू शकत नसल्याचे कुमार यांनी पत्रात म्हटले आहे. सीबीआयच्या सुत्राकडून सांगण्यात आले की, राजीव कुमार यांनी चौकशी थांबवावी यासाठी कायदेशीर पाऊल उचलू नेये यासाठी सीबीआयचे एक पथक आज बारासात न्यायालयात हजर होते.

२ हजार ५०० कोटी रुपयांच्या शारदा घोटाळ्यात कुमार यांची सीबीआयला चौकशी करायची आहे. या प्रकरणात कुमार यांच्याकडून सहकार्य़ मिळत नाही. तसेच त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास ते टाळाटाळ करत असल्याचे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like