फायद्यासाठी विखे कुठेही जातील : बाळासाहेब थोरात

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखेंच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला आहे.

नगरच्या राजकारणात विखेंचे कडवे प्रतिस्पर्धी असलेले बाळासाहेब थोरात विखे-पाटलांवर जोरदार टीका करताना म्हणाले आहेत की ,’विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असलेले राधाकृष्ण विखे-पाटील आपल्या घरातूनच पक्षाविरोधात झालेले बंड थोपवू शकले नाहीत. त्यांचे चिरंजीव सुजय यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीचा काळ आहे रणसंग्राम जवळ आला असताना नेतृत्व करायचं त्यांचाच मुलगा पक्षांतर करतो हे काँग्रेससाठी नक्कीच चांगलं नाही. मुलाची जी भूमिका आहे तीच वडिलांचीही दिसत आहे,’ तसंच विखेंनी पक्षनिष्ठा सिद्ध करावी, असं आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

पक्षांतरातून चुकीचा संदेश गेला-

जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत होती तेव्हा विखे परिवाराने दगाफटका केला. बाळासाहेब विखे यांनी ‘मसका’ काँग्रेस काढली होती. मध्यंतरी विखे पिता-पुत्र शिवसेनेतही गेले. शिवसेनेतून पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांना पक्षाने मंत्रिपद दिले. आता सुजय हे भाजपात गेले. आपल्या मुलाचा हा बालहट्ट राधाकृष्ण विखे यांनी थांबवायला हवा होता. ते स्वत: राज्यात विरोधी पक्षनेते आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही हे पक्षांतर थांबले नाही. यातून चुकीचा संदेश गेला आहे.

फायद्यासाठी विखे कुठेही जातील-

काँग्रेस पक्षाने विखे परिवाराला गेल्या पन्नास वर्षांपासून मागेल ती सत्तेची पदे दिली. त्यावरच विखेंच्या संस्था उभ्या राहिल्या. मुलाने काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणे हा बालहट्ट आहे की काही निश्चित धोरण, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. पण मागील अनुभव पाहता फायद्यासाठी विखे कुठेही जातील, असे टीकास्त्र बाळासाहेब थोरात यांनी सोडले.

ह्याही बातम्या वाचा –

मसूदचा आज संयुक्त राष्ट्रात फैसला, चीनच्या भूमिकेवर सर्वांची नजर

राजीनाम्याविषयी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा खुलासा…

Video : राधाकृष्ण विखे-पाटलांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन पाहा व्हिडीओ, 

लोकसभेसाठी शिवसेनेकडून महाराष्ट्रातील २३ संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर  २३ संभाव्य उमेदवार कोण आहेत हे वाचा सविस्तर

गांधी-वाड्रा घराण्याचा ‘फॅमीली पॅकेज’ भ्रष्टाचार : भाजपकडून हल्लाबोल

पालघर मतदारसंघात सर्वच पक्षांची उमेदवार शोधासाठी पंचाईत