चीनसोबत तणाव वाढल्यास ट्रम्प भारताचं समर्थन करतील याची कोणतीही खात्री नाही : जॉन बोल्टन

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे की, जर चीन-भारत सीमा तणाव वाढला तर याची कोणतीही गॅरंटी नाही की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या विरूद्ध भारताला समर्थन देतील. बोल्टन यांनी एका टेलिव्हिजनच्या मुलाखतीमध्ये म्हटले की, चीन आपल्या सर्व सीमांवर आक्रमक पद्धतीने वागत आहे, पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रात तसेच जपान, भारत आणि अन्य देशांसोबत त्याचे संबंध खराब झाले आहेत, हे स्पष्ट आहे.

ट्रम्प चीनच्या विरूद्ध भारताला कुठपर्यंत समर्थन करण्यासाठी तयार आहेत, असे विचारले असता बोल्टन म्हणाले, मला माहित नाही ते काय निर्णय घेतील आणि मला वाटत नाही की त्यांना सुद्धा याबाबत काही माहिती असेल. मला वाटते, ते चीनसोबत भौगोलिक संबधाची रणनिती पाहतात, उदाहरणार्थ, विशेष रूपात व्यापाराच्या चष्म्यातून.

बोल्टन म्हणाले, मला माहित नाही ट्रम्प नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर काय करतील…ते मोठ्या चीन व्यापार करारावर पुन्हा येतील. जर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला तर ते कुणाचे समर्थन करतील सांगू शकत नाही.

जर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला तर याची कोणतीही गॅरंटी नाही की ट्रम्प चीनच्या विरूद्ध भारताला समर्थन देतील, असे वाटते का, यावर ते म्हणाले, होय हे खरं आहे. बोल्टन म्हणाले, त्यांना वाटत नाही की, ट्रम्प यांना भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या इतिहासाबाबत काही माहिती आहे.

बोल्टन म्हणाले की, असे होऊ शकते की, ट्रम्प यांना याबाबत सर्व महिती दिली गेली असावी, परंतु ते इतिहासाबाबत सहज नाहीत. बोल्टन ट्रंप प्रशासनात एप्रिल 2018 पासून सप्टेंबर 2019 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.

ते म्हणाले, मला वाटते की, पुढील चार महिन्यांच्या दरम्यान ते अशा सर्व गोष्टींपासून दूर राहतील ज्यांचा परिणाम त्यांच्या निवडणुकीवर होईल, आणि निवडणुक किचकट होईल, या निवडणुका त्यांच्यासाठी अगोदरपासूनच अवघड आहे. म्हणून ते सीमेवर शांतता असावी, असे धोरण घेतील, मग यातून चीनला लाभ होवो अथवा भारताला.

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये मागच्या आठ आठवड्यापासून पूर्व लडाखमध्ये अनेक ठिकाणांवर वाद निर्माण झाला होता. गलवान खोर्‍यात त्या हिंसक संघर्षानंतर तणाव आणखी वाढला ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. प्रदेशात तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूकडून मागील काही आठवडे कुटनिती आणि सैन्यस्तरावर चचेच्या अनेक फेर्‍या झाल्या आहेत.