ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी केल्याने माजी सैनिकांनी मानले ठाकरे सरकारचे आभार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन (संदीप झगडे) – राज्यातील आज माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला .या मागणीसाठी पुरंदर तालुक्यातील आजी माजी सैनिकांनी पुढाकार घेतला होता.शासनाच्या या निर्णयाचे स्वागत मावडी कडेपठार येथे भंडारा उधळून पुरंदर मधील आजी माजी सैनिकांनी केले व शासन, संबंधित विभागाचे मंत्री, सत्ताधारी व विरोधी पक्ष यांचे आभार पत्र देऊन करण्यात आले.

या बाबत माजी सैनिक प्रकाश भामे यांनी सांगितले की राज्यातील आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून सूट द्यावी या मागणी साठी पुरंदर तालुक्यातील निवृत्त सुभेदार कै किसन झेंडे , कॅप्टन ज्ञानोबा भिंताडे ,माजी सैनिक प्रतिष्ठान, माजी सैनिक बबन भामे,नामदेव कुंभारकर, प्रवीण साळुंखे आदींनी पुरंदर व भोर तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्याशी मुंबई मध्ये बैठक घेऊन या प्रकरणी गाऱ्हाणे मांडले होते. माजीं सैनिक मंत्री दादा भुसे यांच्या विधिमंडळात या मागणीचा पाठपुराव्यास अनुसरून शासनाने हा निर्णय घेतला.

शासनाने आजी माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून सूट दिल्याचा अध्यादेश काढला या निर्णयाचे पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने भंडारा उधळून स्वागत करण्यात आले व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी सैनिक कल्याण मंत्री, समाजकल्याण मंत्री, विरोधी पक्षनेते, तहसीलदार यांना आभाराचे पत्र पाठविण्यात आले असल्याचे प्रकाश भामे यांनी सांगितले. मावडी कडेपठार येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त कॅप्टन ज्ञानोबा भिंताडे, सुभेदार अर्जुन भोर,बबन भामे, ज्ञानदेव कुंभारकर,प्रवीण साळुंखे, भाग्यवान म्हस्के,अविनाश ढोले,नारायण अंकुशे,चंद्रकांत भामे, ग्रामसेविका वैशाली पानसरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश भामे यांनी केले .