माजी सैनिकांना आता आजारावरील उपचारांसाठी मिळणार 50 हजार रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॉन पेन्शनर आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नीनं आता आजारपणासाठी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी या वर्गाच्या माजी सैनिकांना गंभीर आजाराच्या उपचारांसाठी 25 हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. निवृत्तीवेतन न घेतलेले माजी सैनिकही ईसीएसएसशी देखील जोडले गेलेले नाहीत, म्हणूनच सैनिक कल्याण विभाग त्यांना आजारपणाच्या उपचारासाठी ही मदत देतो.

यासाठी उपचार घेत असलेल्या नॉन पेन्शनर माजी सैनिकाला मदतीसाठी अर्ज करावा लागतो. यानंतर माजी सैनिकाला 50 हजारांची मदत मिळते. नॉन पेन्शनर असल्यामुळे तो ईसीएसएसशी जोडलेला नसतो. अशावेळी विभागाकडून त्यांना गंभीर आजारासाठी मदत केली जाते जी रक्कम आधी 25 हजार होती आता तिला वाढवून पन्नास हजार करण्यात आले आहे.

यासाठी पेंशनर नसलेल्या माजी सैनिकांचे उत्पन्न 35 हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. त्याचबरोबर पेंशनर नसलेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांना आर्थिक मदत वाढवून 20 हजार रुपये करण्यात आली आहे.

पूर्वी ही एकरकमी मदत दहा हजार होती. यासाठी 35 हजार पेक्षाही कमी उत्पन्न असणार्‍या पेंशनर नसलेल्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या विधवांना अर्ज करावा लागेल. सैनिक कल्याण विभागाचे ओएसडी अनुपम ठाकुर म्हणाले की, गंभीर आजारासाठी मिळालेली रक्कम 25 वरून 50 हजार करण्यात आली आहे. या प्रवर्गासाठी एकुण आर्थिक मदतही 20 हजारांवर गेली आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/