‘त्या’ माजी जिल्हा परिषद सदस्याला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – व्यापाऱ्यास फसविल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे याला अटक केली. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, या टोळीने महांकाळ वडगाव येथील कापसाचे व्यापारी चांगदेव अंबादास पवार यांना ७५ लाख रुपयांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले होते. गुन्ह्यातील १५ आरोपींना अटक करण्यात यश आले असले तरी अद्यापही ५ आरोपी फरार आहेत. श्रीरामपूर शहर पोलिसांत पवार यांनी फिर्याद दिली होती. पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून त्यांना एमआयडीसी परिसरातून ५ जुलै रोजी लुटले होते.

याप्रकरणी राहुरी येथील सचिन उदावंत, राहुल उदावंत, सर्वेश प्रजापती (जळगाव), शैैलेश उर्फ विकी भंडारी (धुळे), राजेश शिंदे (नान्मज दुमाला, ता.संगमनेर), जितेंद्र पाटील (एरंडोल) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. रविवारी दत्ता मोहन पन्हाळे (शिंदेवाडी, जि.पुणे), किरण काशिनाथ वेताळ (लोणी काळभोर), आशिष याकोब खरात (दौंड), अतुल जयसिंग ज-हाड (केडगाव चौफुला) व बिट्टू कृष्णा वायकर (श्रीरामपूर), दीपक इंगळे, सागर गंगावणे (श्रीरामपूर), सुनील नेमाणे (श्रीरामपूर) यांना दिल्ली येथून ताब्यात घेतले.

या गुन्ह्याचा कट दिलीप वाकचौरे यांनी रचला होता. सुनील नेमाणे व वाकचौरे हे जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते. त्यांनी कट रचल्यानंतर टोळीतील इतरांचा त्यात सहभाग झाला. वाकचौरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. काँग्रेस पक्षाकडून २०१४ मध्ये त्यांनी नेवाशातून उमेदवारी केली होती. परंतु, ते पराभूत झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त