दुष्काळी भागातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचं ‘गिफ्ट’, आता ‘ही’ सुविधा मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने दुष्काळी भागातील इयत्‍ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची संपुर्ण परिक्षा फी राज्य सरकारने माफ करण्याची घोषणा केली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत सविस्तरपणे माहिती दिली आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1156807873692934144/photo/1

दुष्काळी भागातील इयत्‍ता 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासनाचा निर्णय देखील प्रकाशित करण्यात आला आहे. न होणारे प्रात्यक्षिक, मार्कशीट, सर्टिफिकेट आणि इतर शुल्कांसह संपूर्णच फी आता माफ करण्यात आली आहे. प्रतिपूर्ती ऑनलाईन पध्दतीने थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात ती रक्‍कम जमा होणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1156807922476826625/photo/1

राज्य सरकारच्या या निर्णयामुळं दष्काळी भागातील पालकांची मोठी चिंता दूर झाली असुन त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्य सरकार अलिकडील काळात मोठे निर्णय घेत आहे. मात्र, त्यामुळे राज्यातील जनतेला त्याचा खुप मोठा फायदा होत आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1156807968526163968/photo/1

 

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like