Exams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – देशात कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने (Central Government) सीबीएसई आणि आयसीएसईच्या (CBSE, ICSE) 10 वीच्या परीक्षांबरोबरच 12 वीच्या परीक्षा सुद्धा रद्द (Exams Cancelled) करण्याचा करण्याचा निर्णय घेतला. परंतु, केंद्राच्या या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात (Supreme Court) एक आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा आणि CBSE-ICSE बोर्डाचा निर्णय योग्यच असल्यावर न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. Exams Cancelled | supreme court dismissed plea challenging cbse icse decision 12th exams cancelled

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यासाठीच्या पद्धतील आव्हान देणारी याचिका देखील सुप्रीम कोर्टाने यावेळी फेटाळून लावली आहे. आज न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्या. दिनेश मागहेश्वरी (Justice A. M. Khanwilkar, Justice Dinesh Magheshwari) यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. अंशुल गुप्ता नामक व्यक्तीने ही आव्हान याचिका दाखल केली होती. तसेच, उत्तर प्रदेश शिक्षक संघटनेनं विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी दोन्ही बोर्डांकडून स्वीकारण्यात आलेल्या पद्धतीला आव्हान देण्यात आलं होतं. ती याचिका देखील न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावली आहे.

आम्हाला वाटतंय की सीबीएसई आणि आयसीएसई या दोन्ही बोर्डांनी घेतलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. सर्व विद्यार्थ्यांचं हित हा निर्णय घेताना विचारात घेण्यात आलं आहे. केंद्र सरकार आणि CBSE-ICSE बोर्डांकडून हा निर्णय उच्च स्तरावर विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि अन्य घटकांचा विचार करून घेतला आहे. त्यामुळे आम्ही त्यावर निर्णय देणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) स्पष्ट केलं आहे. तसेच, “केवळ इतर संस्था परीक्षा घेऊ शकतात म्हणून बोर्डानं देखील परीक्षा घ्यायला हवी, हा दावा मान्य करता येणार नाही. व्यापक जनहिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर CBSE ने 13 तज्ज्ञांच्या समितीमार्फत हा निर्णय घेतला असल्याचं देखील सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नमूद केलं आहे.

याचिकेमध्ये काय नमूद होत?
केंद्र सरकार आणि CBSE-ICSE बोर्डांच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती.
जर IIT-JEE किंवा CLAT सारख्या परीक्षा ऑफलाईन (Exam Offline) पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात.
तर बारावी बोर्डाच्या परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा प्रश्न याचिका कर्त्याने उपस्थित केला होता.
तसेच, विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यासाठीच्या पद्धतील आव्हान देणारी याचिका देखील सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) यावेळी फेटाळून लावली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन?
3 प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
इयत्ता 10 वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर 30 टक्के मार्क देण्यात येणार आहेत.
त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या 3 विषयांचा समावेश करण्यात येईल.
त्यानंतर 30 टक्के गुण असतील ते 11 वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले 40 टक्के गुण हे 12 वी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि Prelim परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.
10 वीचा निकाल 20 जुलैला आणि 12 वीचा निकाल 31 जुलैला लावण्याचा प्रयत्न असल्याचं बोर्डाकडून स्पष्ट केलं गेलं आहे.

Web Title :- Exams Cancelled | supreme court dismissed plea challenging cbse icse decision 12th exams cancelled

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप !

Reserve Bank of India । नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 3 सहकारी बँकांवर RBI ची कारवाई; बारामती अन् इंदापूरच्या बँकेचा समावेश

LIC पॉलिसीधारकांनो, 30 जूनपूर्वी ‘हे’ काम पूर्ण करा