वाघोलीतील फुटपाथची केबल कंपन्याकडून खोदाई. खोदाई करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची आमदारांची मागणी

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ ) –  पुणे नगर महार्गावरील वाघोलीत नित्याचीच होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे 11कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. यामध्ये वाघेश्वर मंदिर चौक ते केसनंद फाटा (भावडी रोड )दरम्यान रस्ता रुंदीकरण,चौक रुंद करणे ,पावसाळी गटार लाइन,फुथपाथ तयार करून गटू बसवणे,रस्ता दुभाजक सुशोभिकरण तसेच रस्ताच्या दुतर्फा झाडे लावणे या कामाचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होता.पीएआरडीच्या माध्यमातून वाघोलीतील हे रोडचे काम के.आर.कन्स्ट्रकशन या कंपनीला देण्यात आले आहे ,यामध्ये या रस्ताच्या देखभाल,दुरुस्तिची मुदत तीन वर्षांची आहे. मात्र काही ठिकाणी काम अर्धवट बाकी आहे तर काही ठिकाणी फुटपाथवर गटूच बसवले गेले नाहीत तर काही ठिकाचे बसवलेले गटू उखडून गेले आहेत. तर काही ठिकाणी पावसाळी गटार लाइनचे चेंबर आत गेले आहेत. झाडे तर फक्त लावल्याचा दिखावा केला आहे रोड लगतचे लाईट पोल देखील काढले नाहीत.हे सर्व असे असतानाही पीएमआरडीएचे अधिकारी याकडे पूर्ण पणे दुर्लक्ष करत आहे असा आरोप वाघोलीतील स्थानिक नागरिकांनी केला आहे. आता तर टाटा,ओडाफोन, एअरटेल,अश्या खाजगी कंपन्यानी केबल टाकण्याचे काम करताना या फुटपाथची पुरती वाट लावली आहे. या केबल टाकणारा कंपन्याच्या ठेकेदाराकडे समंधित विभागाच्या परवानग्या नसतात असल्या तरी जुन्याच असतात तर काही ठिकाणी नियमानुसार रस्ताच्या मध्यापासून पंधरा मीटरच्या बाहेर परवानगी असताना करोडो रुपये खर्च करून केलेल्या कामाचे खोदकाम ह्या कंपन्याचे ठेकेदार करताना दिसून येत आहेत. सर्व सामान्य जनतेच्या कर रुपी पैशातून केलेल्या कामाची बिनधास्त पणे खोदाई करत सरकारी कामांचे,मालमत्तेचे नुकसान केले जाता आहे.याबाबत पीएमआरडीएच्या संमधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून माहिती घेतली असता ते काम आमच्याकडे येत नाही त्या कामाबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोला आणि त्यांना फोन केला तर ते आमच्याकडे येत नाही पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा अशी टोलवाटोलवीची उत्तरे मिळतात.

तर एका अधिकाऱ्यांने असेही सांगितले हे काम आमचे असून ते आम्ही करून दिल्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखाली येत असते आणि त्यांनी त्यावर लक्ष ठेवने गरजेचे असते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था असो, पीएमआरडीए असो,सार्वजनिक बांधकाम विभाग असो या राजकीय नेते असो सर्वच मंडळीचे याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

या फुटपाथच्या खोदकामाची माहिती मिळताच शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी भेट देत पाहणी करून संबंधित विभागाच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरती संपर्क साधून माहिती घेतली,तर रस्त्याच्या व फुथपाथच्या केलेल्या कामाचे नुकसान करणाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करावेत.अशी मागणी आमदार पवार यांनी डिसिपी पंकज देशमुख यांच्या कडे केली यावेळी पंकज देशमुख यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

कोणत्याही प्रकारच्या परवाना न घेता बिनधास्त पणे कोणीही या आणि रोडची खोदाई कराअसे प्रकार चालू असून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या वर संबंधित विभागाने गुन्हे दाखल करावे.

शिवदास पवार, सामाजिक कार्यकर्ते

हे काम बेकायदा होते ते आम्ही बंद करून फुटपाथचे खोदकाम करून नुकसान करणाऱ्या केबल कंपनीच्या त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई करून घ्यावी, असे न झाल्यास या विरोधात आंदोलन उभारले जाईल.

सर्जेराव वाघमारे, पंचायत समिती सदस्य, हवेली

पीएमआरडीच्या कामाचे नुकसान केले असेल तर गुन्हे दाखल करणार. पीएमआरडीए म्हणजे महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत नाही.आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था यांचे काम केले आहे आणि त्या कामांची देखभाल करणे हे त्यांचे काम आहे.

सुहास दिवशे, पीएमआरडीए आयुक्त.

रस्त्याचे व रोडलगत जे काम चालू आहे त्यांचे केबल टाकणाऱ्या ठेकेदाराकडून नुकसान केले जात आहे त्यांच्याविरुद्ध आम्ही वेळोवेळी पोलिसात तक्रारी अर्ज दाखल केली आहे पण पोलिसांकडून त्यांच्यावरती कोणत्याही कारवाई आज पर्यंत झाली नाही.

सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी,पूर्व विभाग आणि ठेकेदार साइट अधिकारी