अरे वा ! मोबाईल करणार निकृष्ट दर्जाचे पदार्थ ‘चेक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ऑनलाइन पद्धतीने जेवण मागवण्याचा मोठा ट्रेंड आहे मात्र हे खाद्य पदार्थ किती सुरक्षित आहेत याची आपण खात्री करून घेऊ शकत नाही. एखादे बंद डब्यातील पदार्थ विकत घेताना आपण फार फार तर त्याची एक्सपायरी डेट पाहून घेतो. मात्र आता हे पदार्थ चांगले आहेत किंवा नाहीत हे आता तपासता येणार आहेत.
लंडनमधील इम्पीरियल कॉलेजने तयार केलेल्या सेन्सरमुळे खाद्यपदार्थांना खराब करणाऱ्या अमोनिया आणि ट्रायमिथायलामाइनचे प्रमाण समजते. यामुळं पदार्थ खराब झाला आहे की नाही हे समजतं. तसेच हे सेन्सर इको फ्रेंडली असून स्मार्टफोनला जोडून पॅकेज फूड खराब झाले आहे की नाही हे पाहता येईल. त्याचप्रमाणे हा सेन्सर पेपरवर आधारित असल्याने याला इलेक्ट्रिकल गॅस सेन्सर असं नाव देण्यात आलं आहे.
हा सेन्सर लावल्यानंतर पदार्थांवर एक्सपायरी डेट टाकायची गरज पडणार नाही, असं या संशोधकांचं म्हणनं आहे. हा एकमेव सेन्सर आहे जो व्यावसायिक स्तरावर वापरता येईल. याची किंमत फक्त दीड रुपया असल्यानं वस्तुच्या किंमतीतही फारसा फरक पडणार नाही असा संशोधनकर्त्यांनी दावा केला आहे.