WHO चा मोठा खुलासा, म्हणाले- कोरोना मृतांची खरी आकडेवारी भलतीच; 60 ते 80 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जगात थैमान घातले आहे. जगात कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल 16 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केला आहे. याच दरम्यान WHO मोठा खुलासा केला आहे. कोरोनाने झालेल्या सर्वच मृत्यूंची नोंद झाली नाही. सध्या जी आकडेवारी समोर येत आहे ती सरकारी आहे. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे WHO ने म्हटले आहे.

WHO म्हणण्यानुसार आतापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आत्तापर्यंत जगात आधिकृत 34.46 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोनाने प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. मात्र, या सर्वच आकडेवारीची आपल्याकडे नोंद झाली नाही. अनेक ठिकाणाहून समोर येणारे आकडे प्रत्यक्षात खूप मोठे असल्याची भिती WHO ने व्यक्त केली आहे. मे 2021 पर्यंत कोरोनाने 34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

मात्र ही सरकारी आकडेवारी असून खरी संख्या 2 ते 3 पट अधिक असण्याची शक्यता असल्याचे WHO च्या असिस्टट डायरेक्टर-जनरल (डेटा आणि एनालिटिक्स विभाग) समीरा आसमा यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पहिल्या आणि दुस-या लाटेत अनेक ठिकाणी रुग्णांना दवाखाने अन् बेड उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे नोंदीपेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत, असे आसामा यांनी म्हटले आहे. WHO चे डेटा एनालिस्ट विलियम मेसेम्बूरी यांनीही आसमा यांच्या मताला दुजोरा दिला आहे.