सावधान, आयुर्वेदिक आणि हर्बल पदार्थांचे अतिसेवनही पडू शकते महागात !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आयुर्वेदिक आणि हर्बल पदार्थांचे सेवन केल्याने आराेग्य चांगले रहाते, आयुर्वेदिक गोष्टींचे कोणतेही साइड इफेक्टही नसतात, असे म्हटले जाते. परंतु, हा गैरसमज असल्याचे काही परदेशी तज्ज्ञ सांगतात. हर्बल जडी-बूटीपासून तयार पदार्थांमुळेही साइड इफेक्ट होऊ शकतात. जर जास्त प्रमाणात हे पदार्थ सेवन केले तर याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा कॅनेडियन मेडिकल असोसिएशन या जर्नलमध्ये प्रकाशित एका अहवालात देण्यात आला आहे.

कॅनडात एका व्यक्तीला हाय ब्लडप्रेशरचा त्रास होऊ लागल्याने तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तुम्ही काय खाल्ले किंवा प्यायले होते? असे जेव्हा या रूग्णाला डॉक्टरांनी विचारले तेव्हा रूग्णाने सांगितले की, त्यांने ज्येष्ठमधाचा होममेड चहा सेवन केला होता, ज्यानंतर हाय ब्लडप्रेशरचा त्यास त्रास होऊ लागला. या व्यक्तीचे वय ८४ होते आणि ते ज्येष्ठमधाच्या होममेड चहाचे पूर्वीपासून सेवन करत होते. त्यांचा बीपी प्रमाणापेक्षा अधिक वाढला होता. ज्यामुळे त्यांना डोकेदुखी, छातीत वेदना, फार जास्त थकवा आणि पायांमध्ये फ्लूइड रिटेंशनची समस्या झाली होती. रुग्णाने डॉक्टरांना सांगितले की, ते गेल्या दोन आठवड्यापासून दररोज दिवसातून १ किंवा २ ग्लास होममेड ज्येष्ठमधाच्या चहाचे सेवन करत होते.

हर्बल प्रॉडक्ट्सचे जर अधिक प्रमाणात सेवन केल्यास त्याचे साइड इफेक्ट्स होतात. ज्या प्रॉडक्ट्समध्ये ज्येष्ठमधाचा वापर केला जातो, त्यांच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते. तसेच डोकेदुखी आणि छातीत वेदना होण्याची शक्यता असते. ज्येष्ठमधाचा वापर केलेल्या पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास बीपी वाढतो. शरीरात वॉटर रिटेंशन होते आणि पोटॅशिअमचे प्रमाणही कमी होते.