Excise Duty On Petrol-Diesel | 1 लीटर पेट्रोल-डिझेलमधून किती कमाई करते सरकार? संसदेत मोदी सरकारने दिले उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Excise Duty On Petrol-Diesel | एक लीटर-पेट्रोल डिझेलच्या किमतीमधील किती पैसे सरकारच्या खिशात जातात हे अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) सोमवारी लोकसभेत (Lok Sabha) एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय (Mala Roy) यांच्या प्रश्नाच्या उत्तरात मोदी सरकारने (Modi Government) सांगितले की, केंद्र सरकार एक लीटर पेट्रोलवर 27.90 रुपये आणि एक लीटर डिझेलवर 21.80 रुपये एक्साईज ड्यूटी (Excise Duty On Petrol-Diesel) घेते.

 

मंत्रालयाने सविस्तर माहिती (Detail Information) देत सांगितले की, प्रति लीटर पेट्रोलसाठी 1.40 रुपये बेसिक एक्साईज ड्यूटी,
11 रुपये अतिरिक्त एक्साईज ड्यूटी, 13 रुपये (रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस), आणि 2.5 रुपये कृषी आणि विकास इन्फ्रास्ट्रक्चर सेसच्या रूपात घेतले जातात.
ही एकुण रक्कम 27.90 रुपये होते.

 

तर डिझेलसाठी 1.80 रुपये बेसिक एक्साईज ड्यूटी, 8 रुपये विशेष एक्साईज ड्यूटी, 8 रुपये रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस,
4 रुपये कृषी आणि विकास इन्फ्रास्ट्रक्चर सेस म्हणून घेतले जातात.
म्हणजे एकुण 21.80 रुपये. (Excise Duty On Petrol-Diesel)

 

मागील काही महिन्यात प्रचंड वाढवले दर

 

मागील काही महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर आकाशाला जाऊन भिडले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात कमी होऊनही केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी न करता स्थिर ठेवले होते.

 

मात्र, अलिकडेच मोदी सरकारने या दरात थोडा दिलासा दिला आहे. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या दरात 26 दिवसांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सोमवारी जारी झालेल्या दरानुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर 103.97 रुपये प्रति लीटर आहे.
तर डिझेलची विक्री 86.57 रुपये प्रति लीटरने होत आहे.

 

Web Title : Excise Duty On Petrol-Diesel | Modi government receives rs 27 90 excise duty on petrol rs 21 80on diesel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune School Reopen | पुण्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरला नाही तर ‘या’ तारखेला सुरु होतील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माहिती

Parbhani Crime | झोपेतच मृत्यूने गाठलं ! घरावर उसाची ट्रॉली पडून महिलेचा मृत्यू, 8 वर्षाची नात गंभीर जखमी

Rekha Jare Murder Case | रेखा जरे हत्याकांडाला वर्ष झाले तरी न्यायालयात सुनावणी नाही