उत्पादन शुल्क निरीक्षक 15 हजारांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – इस्लामपूर येथील उत्पादन शुल्क निरीक्षक शहाजी पाटील यांना पंधरा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

अधिक माहितीनुसार, बिअर बारचा परवाना नुतनीकरण करण्यासाठी निरीक्षक शहाजी पाटील यांनी १५ हजारांची लाच मागितली होती. मंगळवारी लाच स्वीकारताना पाटील यांना इस्लामपूर येथे मंगळवारी (दि.०६) सापळा लावून अटक करण्यात आली आहे. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरुदत्त मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच ५ वर्षात पहिल्यांदाच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी लाच घेताना सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.