50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

बीडः पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी 50 हजाराची लाच स्विकारताना बीड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला एसीबीने (Anti Corruption Bureau) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने (Anti Corruption Bureau) बुधवारी (दि. 2) दुपारी ही कारवाई केली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर (वय 40) असे अटक केलेल्या लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी दिंडकर यांने तक्रारदाराविरोधात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यातून कमी करण्यासाठी तक्रारदाराकडे 75 हजाराची लाच मागिती होती. पण तडजोडी अंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तर दुसरीकडे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने बुधवारी दुपारी बीड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सापळा रचून आरोपी दिंडकर याला 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.

औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, प्रभारी अप्पर पोलीस अधिक्षक मारुती पंडीत. पोलीस उपनिरीक्षक ब्रम्हदेव गावडे, याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास घनवट, पोलीस अंमलदार मिलींद इणर, रविद्र काळे, भूषण देसाई, चंद्रकांत शिंदे आदीनी ही कारवाई केली.

 

Also Read This : 

व्हॅक्सीनची जादू ! इस्त्रायलमध्ये कोरोनाचा ‘खात्मा’, सर्व प्रतिबंध हटवले; UK मध्ये 10 महिन्यानंतर एकही मृत्यू नाही

 

घरी करा 3 Steps मध्ये हेअर स्पा, केस होतील चमकदार आणि सिल्की; जाणून घ्या

 

Pune Metro Project : कामगार पुतळा झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया 4 ते 8 जून दरम्यान पुर्ण करणार; नवीन सदनिका नोंदणीसाठी उपस्थित न राहाणार्‍या पात्र झोपडीधारकाचा हक्क संपुष्टात येणार – राजेंद्र निंबाळकर (सीईओ, एसआरए)
जाणून घ्या- ‘डोळे लाल’ होण्याची कारणे व घरगुती उपाय

 

लयभरी ! आता घरबसल्या करा Aadhaar Card वरील चुक दुरूस्त, मोबाईलवरून ‘या’ पद्धतीने करा अपडेट; जाणून घ्या

 

पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या