Excise Officer Suspended | राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील अधिकार्‍यासह 4 जण तडकाफडकी निलंबीत

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे जिल्ह्यातील (Pune district) जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (Narayangaon) येथील 4 परमिट रुम व एका देशी दारुच्या दुकानावर मुंबई भरारी पथकाने छापा टाकला होता. याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला. यामध्ये नारायगाव येथील राज्य उत्पादन शुक्ल कर्यालयातील निरीक्षक, दुय्यम निरक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप (State Excise Commissioner Kantilal Umap) यांनी निरीक्षक, दुय्यम निरक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना निलंबित (Excise Officer Suspended) करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे निलंबन (Excise Officer Suspended) करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

जुन्नर तालुक्यातील (Junnar taluka) नारायणगाव दारु उत्पादन शुल्क कार्यालयातील निरीक्षक जी.डि. कुचेकर (Inspector G.D. Kuchekar), नारायणगाव बिट क्र.1 चे दुय्यम निरीक्षक ए.ई. तातळे (A. E. Tatale), जवान विजय घुंदरे (Vijay Ghundre), दिलीप केकरे (Dilip Kekare) असे निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई भरारी पथकाने 25 जुलै रोजी नारायणगाव येथील परमीटरुम व देशी दारुच्या दुनावर छापा टाकला होता. त्यावेळी विना वाहतूक पास असलेला विविध कंपन्यांची देशी व विदेशी दारु आढळून आली होती.

 

मुंबई भरारी पथकाने वरिष्ठ कार्यालयात दिलेल्या अहवालानुसार नारायणगाव दारु उत्पादन शुल्क कार्यालयातील निरीक्षक जी.डि. कुचेकर, नारायणगाव बिट क्र.1 चे दुय्यम निरीक्षक ए.ई. तातळे, जवान विजय घुंदरे, दिलीप केकरे यांनी नारायण कार्यालय अधिकार क्षेत्रातील या बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. असे प्रकार उघडकीस न आणल्याने व या कार्यक्षेत्रात अनेक प्रकारचे गंभीर विसंगती प्रकरणे आढळून येऊनही वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही. तसेच कोणतीही कारवाई न केल्याने कर्तव्यात कसून व शासनाची प्रतिमा मलीन केल्याचे सिद्ध झाल्याने चार जाणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Web Title : Excise Officer Suspended | pune state excise office inspector deputy inspector and two employees suspended

 

Sanjay Raut | संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला, म्हणाले…

Crime News | अनोळखी महिलेला तरुणानं मारली घट्ट मिठी; दादर रेल्वे स्टेशनवरील विचित्र प्रकार समोर

Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं