ब्रॉडबँड प्लान्सवर जबरदस्त ऑफर, 50 रूपये अगाऊ देऊन स्पीड करा दुप्पट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रसिद्ध ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइड करणारी कंपनी एक्साइटेल (Excitel) ने आता जबरदस्त अशी ऑफर आणली आहे. ज्यात फायबर प्लॅन सदस्य केवळ ५० रुपये अतिरिक्त देऊन आपली स्पीड डबल करू शकतात. Excitel चे मंथली अनलिमिटेड फायबर प्लॅन ३९९ रुपये १०० Mbps, ४४९ रुपये २०० Mbps, ४९९ रुपये ३०० Mbps चे आहेत.

दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, हैदराबाद, बंगळुरू, विशाखापट्टनम यांसारख्या १७ शहरात सुरू असलेल्या Excitel चे सदस्य एका महिन्याकरिता अनलिमिटेड इंटरनेट फायबर प्लॅन घेत असेल, तर त्यांना १०० Mbps साठी ६९९ रुपये, २०० Mbps करता ७९९ रुपये आणि ३०० Mbps स्पिडसाठी ८९९ रुपये प्रतिमहिना मोजावे लागतील. तसेच ३ महिन्याचा Excitel अनलिमिटेड फायबर प्लॅन असणाऱ्या सदस्यांना यापुढे १०० Mbps साठी ५६५ रुपये, २०० Mbps साठी ६३८ रुपये आणि ३०० Mbps स्पीड साठी ७३२ रुपये महिन्याकाठी द्यावे लागतील.

Excitel अनलिमिटेडच्या ४ महिन्यांचा प्लॅन असलेल्या सदस्यांना १०० Mbps साठी ५०८ रुपये, २०० Mbps साठी ५७२ रुपये आणि ३०० Mbps साठी ६३६ रुपये मोजावे लागणार. ६ महिन्यांच्या अनलिमिटेड प्लॅनसाठी सदस्यांना १०० Mbps साठी ४९० रुपये, २०० Mbps साठी ५४५ रुपये आणि ३०० Mbps साठी ६०० रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे ९ महिन्याच्या अनलिमिटेड प्लॅनसाठी सदस्यांना १०० Mbps करता ४२४ रुपये, २०० Mbps साठी ४७१ रुपये आणि ३०० Mbps साठी ५३३ रुपये प्रतिमहिना मोजावे लागणार.