धक्कादायक ! बंद खोलीत आढळला माय-लेकींचा मृतदेह

पोलीसनामा ऑनलाईन : उत्तर प्रदेश राज्यातील फारुखाबाद शहरातील पोलीस हद्दीमध्ये मंगळवारी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तेथील एका घरात माय-लेकीचा मृतदेह आढळला असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. माय-लेकीचा मृतदेह सापडल्यानंतर गावात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बंद खोलीत माय-लेकीचा मृतदेह आढळला असून ही हत्या असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाल गेट घटिया घाट रोडजवळील कबाडा गल्लीमध्ये दुर्गंधी पसरली होती. शेजार्‍यांनी मृतदेह कुजल्यासारखी दुर्गंधी येत आहे, असे पोलिसांनी कळवले. पोलिसांनी खोलीचे दार उघताच त्यांना धक्काच बसला. तेथे द्वारिका प्रसाद यांची पत्नी रामकली (60) आणि त्यांची मुलगी (35) याचा मृतदेह पडला होता. तो मृतदेह पूर्णपणे सडून गेला होता.

याबाबत परिसरातील लोकांनी सांगितले की, या घरात नेहमीच वाद होत होते. आई-लेक आणि मुलामध्ये नेहमी भांडणे होत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घरात कोणत्याच हालचाली आढळून आल्या नाहीत. त्यांचा मुलगा लालू याने सांगितल्यानंतर माय-लेकींनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार त्यांचा वाद न्यायालयात गेला होता. पोलिसांतील वरिष्ठांनी याबाबत सांगितले की, दोघींचे शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतर नेमका खुलासा होईल, या घटनेनंतर अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी ही हत्या असल्याचे सांगितले आहे. मात्र, याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.