…म्हणून ‘बिग बॉस 14’ मध्ये जाण्यासाठी ‘अंगुरी भाभी’ शुभांगीनं दिला ‘नकार’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भाभीजी घर पर है या मालिकेतून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या चर्चेत आहे. शुभांगी म्हणजेच अंगुरी भाभी गेल्या काही दिवसांपासून आपल्या लुकमुळे चर्चेत येत आहे. शुभांगीचे अनेक फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत. फोटोनंतर शुभांगी नुकतीच टिकटॉकमुळं चर्चेत आली होती. सध्या सुरू असलेल्या #BanTikTok या अभियानाला तिनं सपोर्ट केला होता. यानंतर आता तिनं बिग बॉस 14 मध्ये जाण्याबद्दल खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेला एका मुलाखतीत ती बोलत होती. तिला बिग बॉस 14 साठी अप्रोच करण्यात आलं आहे.

शुभांगी म्हणाली, “होय, हे खरं आहे की, मला बिग बॉस 14 साठी कॉल आला आहे. परंतु मी सध्या भाभीजी घर पर है ही मालिका करत आहे. माझ्यासाठी माझी मालिका आधी आहे. त्यामुळं बिग बॉसमध्ये जाण्याचा काही प्रश्न येत नाही.”

पुढे बोलताना शुभांगी म्हणाली, “बिग बॉससारखा शो हा माझ्यासाठी नाहिये. कारण लोकांना जो कंटेट हवा आहे तो मी नाही देऊ शकत. मला भांडण करायला जमत नाही. परंतु तरीही पुढे काय होईल मला नाही माहित. असंही होऊ शकतं की, पुढे जाऊन माझं मन बदलेल आणि मी बिग बॉसचा हिस्सा बनेन.”

View this post on Instagram

Yun hiiii,,,,,🦋🦋 #thoughtsbecomethings

A post shared by 🌼Shubhangi.A🌼 (@shubhangiaofficial) on

‘मुलीकडे पाहून ऑफरला म्हटलं No’
शुभांगी म्हणाली, “एक आई या नात्यानं मला माझ्या मुलीचीही काळजी घ्यायची आहे. तिच्या बद्दलही विचार करायचा आहे की, ती मला टीव्हीवर कसं पाहणार आहे. ज्या पद्धतीची भाषा त्यात वापरली जाती माझी इच्छा नाहीये की, मुलीनं ते पहावं. तसं तर बिग माझा फेवरेट शो आहे.”

शुभांगीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शुभांगीनं भाभीजी घरपर है या मालिकेत शिल्पा शिंदेला रिप्लेस केलं आहे. शुभांगीच्या अभिनयाला चाहत्यांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. तिला मालिकेत येऊन 3 वर्ष झाली आहेत. ती खूप लवकर या रोलमध्ये फिट झाली. शुभांगीनं याआधी दो हंसो का जोडा, कस्तुरी, चिडीया घर, कसौटी जिंदगी की, यांसारख्या फेमस मालिकेत काम केलं आहे.

View this post on Instagram

💛💛💛 #colorscheme #yellow

A post shared by 🌼Shubhangi.A🌼 (@shubhangiaofficial) on

View this post on Instagram

#dancelove

A post shared by 🌼Shubhangi.A🌼 (@shubhangiaofficial) on

View this post on Instagram

#dancelove

A post shared by 🌼Shubhangi.A🌼 (@shubhangiaofficial) on

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like