रेल्वे सणासुदीच्या काळात स्पेशल ट्रेनमध्ये वसूल करणार 30 % अतिरिक्त किराया, धावणार 100 हून अधिक विशेष रेल्वे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रवासी सुविधांसाठी दररोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने रेल्वेने दुर्गा पूजा, दीपावली आणि छठ पूजे निमित्त प्रवस्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी १०० हून अधिक फेस्टिव्हल स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या मते, या विशेष गाड्या नवरात्र (नवरात्री) दरम्यान 20 ऑक्टोबर ते दीपावली दरम्यान आणि छठ पूजे पर्यंत म्हणजेच 30 नोव्हेंबर दरम्यान धावतील. तथापि, या फेस्टिव्हल विशेष गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे सामान्य भाड्यांपेक्षा जास्त भाडे घेणार आहे.

व्यस्त मार्गांसाठी बनविल्या जाणार्‍या विशेष गाड्यांची यादी
देशातील वेगवेगळ्या व्यस्त मार्गांवर फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवण्यासाठी रेल्वे विभाग यादी तयार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या विशेष गाड्यांची घोषणा या आठवड्याच्या अखेरीस रेल्वेकडून केली जाईल. ते म्हणतात की, फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनचे भाडे सामान्य गाड्यांच्या तुलनेत ३० टक्के जास्त असेल, म्हणजेच या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना त्यांचे खिसे अधिक मोकळे करावे लागतील. रेल्वे सामान्य दिवसात दररोज सुमारे 12 हजार गाड्या धावत असतात, परंतु कोरोनाव्हायरस संकटांच्या दरम्यान, मागणीनुसार हळूहळू गाड्या सुरू केल्या जात आहेत.

उत्सवांसाठी अनेक गाड्या केल्या बुक
भारतीय रेल्वेच्या सध्या सुमारे 400 विशेष गाड्या धावत आहे. सण-उत्सवांसाठी गाड्यांची मागणी वाढली आहे. अनेक मार्गांवर रेल्वेचे बुकिंग पूर्ण झाले आहे. अशा स्थितीत अनेक मार्गांवर सणांच्या वेळी रेल्वेमार्फत विशेष गाड्या चालवल्या जातील.मागणीनुसार या गाड्यांची संख्याही 100 पेक्षा जास्त असू शकते. अलीकडेच रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव यांनी सांगितले होते की सणाच्या हंगामात रेल्वे 200 हून अधिक फेस्टिव्हल विशेष गाड्या चालवणार आहे. त्याचबरोबर, विशेष गाड्यांची संख्या देखील आवश्यकता भासल्यास किंवा जास्त मागणीनुसार वाढवल्या जाऊ शकते.