वीज ग्राहकांना दिलासा ! 1 एप्रिलपासून वीजदर 2 टक्क्यांनी कमी करण्यात येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – १ एप्रिल २०२१ पासून वीज दर सुमारे २ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय एमईआरसीकडून घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा भेटणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होताना नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीकडून वीज कंपन्यांना एफएसी फंडचा वापर करुन ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एमईआरसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मार्च २०२० मध्ये या एफएसी फंडच्या माध्यमातून जनतेला दिलासा द्यायला सुरुवात केली आहे. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, इंडस्ट्रीसाठी १० टक्के वीज दर कमी करण्यात आले आहेत. यामुळे १ एप्रिल २०२१ पासून या संपूर्ण वर्षात टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कोणाला किती टक्के वीज दर कपात कारावे लागणार आहे

१) महावितरण – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून १ टक्के तर नॉन रहिवाशीसाठी कंपनी, इंडस्ट्री यांना २ -५ टक्के वीजदरात कपात करावी लागणार आहे.

२) बेस्ट – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून ०. १ टक्के तर नॉन रहिवाशी, कंपनी, इंडस्ट्री यांना ०.३ – २.७ टक्के वीजदरात कपात करावी लागणार आहे.

३) अदानी – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून ०. ३ टक्के तर नॉन रहिवाशी, कंपनी, इंडस्ट्री यांना १. ४- १. ६ टक्के वीजदरात कपात करावी लागणार आहे.

४) टाटा – रहिवाशी इमारतींसाठी एप्रिलपासून ४. ३ टक्के तर नॉन रहिवाशी, कंपनी, इंडस्ट्री यांना १. १ – ५. ८ टक्के वीजदरात कपात करावी लागणार आहे.