‘आम्ही निकालापुर्वीच ठरवलं होतं’, संजय राऊतांनी सांगितलं सत्ता स्थापनेचं ‘गणित’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचे सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं. हे काय टेस्ट ट्युब बेबी नसून बाळ व्यवस्थित जन्मला आलेले आहे. त्याला पाळ्यात ठेवण्यात आले असून बारसंही झालंय, आता त्याचा वाढदिवस होईल असे सांगत राऊत यांनी महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार म्हणणाऱ्यांना टोला लगावला. पुण्यात एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत बोलत होते. संजय राऊत पुढे म्हणाले, ते शब्द पाळणार नाहीत याची मला खात्री होती. माझं ते मांझं, तुझं ते माझ्या बापाचं असंच त्यांनी ठरवलं होतं. विधानसभेच्या जागावाटपात काही गोष्टी घडत गेल्या. हे नंतर गडबड करणार हे लक्षात आले होते. पण हे चक्र फिरत राहिले आणि त्यातून हे सरकार निर्माण झाल्याचा खुलासा त्यांनी केला.

शरद पवारांवर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा
शरद पवार यांच्यावर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे. ठाकरे-पवार यांचा जनमाणसावर प्रचंड प्रभाव-पगडा आहे. हेच सरकार परिवर्तन घडवू शकते. या सरकारला कुणी खिचडी सरकार म्हणत नाही तर लोक सरकार म्हणतात. या सरकारचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहे आणि त्यांच्या पाठीशी शरद पवार ठामपणे उभे आहेत.

पहिल्या दिवसापासून ठरले होते…
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणे आमच्यासाठी धक्कादायक नव्हते. पहिल्या दिवसांपासून ठरले होते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हावे. मी सातत्याने सांगितले होते की आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील. ताजमध्ये झालेल्या 11 तारखेच्या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते, असे राऊत यांनी सांगितले.
ते आमची स्टेपनी घेऊन गेले अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन केल्यावर आम्हाला फार काही वाटले नाही. हा फुसका बार आहे हे माहित होते.

आमच्या गाडीचं चाक नाही, तर ते आमची स्टेपनी घेऊन गेले होते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. मुख्यमंत्री बॉस असतो आणि तो शिवसेनेचा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मातीतील पक्ष आहेत. आम्हाला आकडा कळत नाही, आम्ही आकडा लावला. प्रत्येक खात राज्यासाठी महत्त्वाचे असते, गृह खातं राष्ट्रवादीला दिलं हे आमचंच सरकार आहे, असेही राऊत यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.

पुढच्या 5 वर्षाच प्लॅनिग केलंय
आज लोकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. पूर्ण पाच वर्षे आम्ही सरकार चालवणार आहोत. पुढच्या पाच वर्षाचं सुद्धा आम्ही प्लॅनिंग करून ठेवले आहे. आमची भूमिका ठाम असते. आम्ही करायचं ठरवलं आणि सरकार चालवणार. पडद्या मागच्या गोष्टी पडद्यामागे राहु दिल्या तर सिनेमा चालू राहिल. हे सरकार सुपरहिट सिनेमा असल्याचे राऊत यांनी सांगतिले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/