World Cup २०१९ : ‘या’ खेळाडूला डावलण्याचा निर्णय विराट कोहलीला भोवणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. संघात अनुभवी आणि चांगल्या खेळाडूंना स्थान दिले गेले नाही, त्यामुळे संघाच्या निवड समितीवर अनेकांनी प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे.

वर्ल्ड कप संघात अंबाती रायडू आणि रिषभ पंत हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र निवड समितीने दोघांनाही डच्चू दिले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तसंच अजिंक्य रहाणेलाही संघात घेण्यात आले नाही. त्यांच्या जागेवर केदार जाधव आणि विजय शंकर यांना संघात जागा देण्यात आली.

अंबाती रायडूनं २०१३ साली भारताकडून पर्दापण केलं होतं. त्यानंतर त्यानं भारताकडून ५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. रायडूच्या एकदिवसीय क्रिकेटमधली सरासरी पाहिली तर, अंबाती रायडूला वगळण्याचा हा निर्णय विराट कोहलीला आणि निवड समितीला महागात पडणार हे स्पष्ट होईल. कारण भारतासाठी सगळ्यात जास्त सरासरी असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अंबाती रायडूचा चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं ४७.०५ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. मात्र रायडूच्या जागेवर विजय शंकरला घेण्यात आले आहे. ज्याला फक्त ७ आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याचा अनुभव आहे.

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक.