पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ बँकेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन
परळी येथील वैद्यनाथ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेशचंद्र कवठेकर यांनी संचालक मंडळाच्या कारभाराला कंटाळून बुधवारी सायंकाळी राजीनामा दिला आहे. ऐन आर्थिक वर्षाच्या शेवटी राजीनामा दिल्यामुळे आर्थिक क्षेत्रात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

कवठेकर यांनी आपल्या कार्यकाळात बँकेला उत्तुंग शिखरे गाठून दिली. परंतु , नोट बंदीच्या काळात मुंबई येथे पकडलेली बँकेची रक्कम, परळीतील सभासद सुभाष निर्मळ यांनी समोर आणलेले अनेक प्रकरणांमुळे राजीनामा दिला असावा, मात्र हा राजीनामा बँकेच्या प्रशासनाने स्वीकारला की नाही याची माहिती मिळू शकली नाही. वैद्यनाथ बँकेच्या कार्यकारी पदाची तात्पुरती जबाबदारी खर्चे यांच्याकडे सोपवल्याची माहिती मिळाली आहे

दरम्यान , गेल्या आठवड्यात वैद्यनाथ साखर कारखान्यावर अन्न औषध प्रशासनाने कारवाई केली होती.