Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

अहमदनगर : Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईबाबत आढावा बैठकीत आमदारांना धरणातील पाण्याबाबत वस्तूस्थितीदर्शक माहिती अवगत करु न शकल्याने पाटबंधारे विभागाचे (Irrigation Department) कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना शासनाने निलंबित केले आहे. राज्याचे सहसचिव डॉ. सुदिन गायकवाड (Dr Sudin Gaikwad) यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. (Ahmednagar News)

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १२फेब्रुवारी रोजी टंचाई बैठक घेण्यात आली होती. त्यात सीना धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी आमदार राम शिंदे यांनी केली. त्यावेळी धरणात पाणी असून देखील आवर्तन सोडण्यास विलंब केला व शेतकर्‍यांना वेठीस धरले म्हणून आमदार राम शिंदे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.(Executive Engineer Kiran Deshmukh Suspended)

त्यानंतर शासकीय पातळीवर हालचाल सुरु झाली. कुकडी पाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख हे लोकप्रतिनिधी यांना वस्तुस्थितीदर्शक माहिती अवगत करु शकले नाहीत. परिणामी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांच्याशी आवर्तनाबाबत योग्य समन्वय न झाल्याचे जिल्हाधिकारी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी अहवालात नमूद केले. त्यावरुन शासनाने किरण देशमुख यांना निलंबित केले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९६९चे नियम अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून देशमुख यांना शासन सेवेतून तात्काळ निलंबित करीत असल्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. किरण देशमुख कार्यकारी अभियंता यांचे मुख्यालय अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ पुणे राहील, तसेच त्यांना अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ पुणे यांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही,असे आदेशात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार

Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार, 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन