Executive Engineer Trainee | इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 280 जागांसाठी भरती, लवकर करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – (NTPC Recruitment 2021) सध्याच्या कोरोना काळादरम्यान नोकरीची उपलब्धता दिसून येत नाही. परंतु, भारतातील एक प्रसिद्ध असणारी सरकारी अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपनीच्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (NTPC) इच्छुक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. यामध्ये (Executive Engineer Trainee) एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर प्रशिक्षणार्थी (Executive Engineer Trainee) पदासाठी 280 जागांवर भरती होत आहे. या कंपनीमध्ये अत्यंत चांगल्या पगाराची नोकरीची संधो उपलब्ध आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. या पदासाठी अर्ज करण्याकरता दोनच दिवस बाकी आहेत. यामुळे इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने लवकर अर्ज करू शकतो.

शैक्षणिक पात्रता –
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रात इंजिनीअरिंगची अथवा B.Tech डिग्री, गेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. गेट परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र उमेदवार निवडले जाणार आहेत. म्हणून सर्टिफिकेट आवश्यक आहे.

वयाची अट –
21 वर्षांपेक्षा जास्त आणि 27 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक. तसेच, आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या वर्गांना नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येईल.

असा करा अर्ज –
या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
वेबसाइटच्या होम पेजवर रिक्रूटमेंट सेक्शनमध्ये जा आणि संबंधित पोस्टवर क्लिक करून नोंदणी करा.
नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेच्या सहाय्याने अर्ज भरू शकता.
अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रिंट आउट घ्या.

अर्ज करण्याची प्रक्रिया –
21 मेपासून सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

10 जून.

अधिकृत वेबसाइटवर – ntpccareers.net

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत