अविश्वसनीय ! पार्कमध्ये स्वतःहून व्यायाम करू लागलं मशीन, पोलिसांनी बनवला व्हिडीओ, काही क्षणातच झाला व्हायरल (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कधीकधी सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होतात की ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उद्यानात ठेवलेली मशीन स्वतःहूनच व्यायाम करत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेटर आकाश चोप्रानेही तो शेअर केला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशचा असल्याचे सांगितले जात आहे. काही ट्विटर युजर्सचा दावा आहे की, हा झांसी जिल्ह्यातील एका उद्यानातील आहे.

व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, उद्यानात ठेवलेली मशीन स्वतःच वर-खाली होत आहे. असे वाटते की जणू काही अदृश्य वस्तू मशीन चालवत आहे आणि ती वेगाने व्यायाम करत आहे.

काही पोलिस आणि इतर लोक त्याभोवती उभे असल्याचेही दिसून येत आहेत. दरम्यान काही लोक या घटनेचा व्हिडिओही बनवत आहेत. हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक याला भूत मशीन म्हणत आहेत.

दुसरीकडे बऱ्याच युजर्सचा दावा आहे की, मशीन कशी चालत आहे हे समजले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, काही आगाऊ लोकांनी इतर लोकांना घाबरवण्यासाठी पातळ धागा बांधून ही मशीन चालवली आणि आता त्यांना पोलिसांनी पकडले देखील आहे.