लटकणार्‍या पोटाने त्रस्त असलेल्या महिलांनी घरातच कराव्यात ‘या’ 6 एक्सरसाइज, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आपण लटकणार्‍या पोटामुळे त्रस्त आहात का? तर चिंता करू नका, तुम्ही एकट्या नाहीत, अनेक महिलांना ही समस्या सतावत असते. मात्र, पोटाच्या खालील भागाला टोन करणे खुप अवघड असते. कारण शरीराच्या या भागात सर्वात जास्त फॅट जमा होते. विेशेष करून महिलांमध्ये हार्मोन एस्ट्रोजन या भागात फॅट तयार करण्यासाठी ओळखले जाते. यासाठी आपण शरीराच्या या भागात जमा फॅट कमी करणार्‍या सोप्या एक्सरसाइज जाणून घेणार आहोत.

या एक्सरसाइज तुमच्या संपूर्ण पोटाला मजबूत करतील आणि तुमचे हात, पाय आणि हिप्स सुद्धा कमी करतील. जर तुम्हाला सुद्धा कमी वेळेत लटकणारे पोटाची चरबी कमी करायची आहे आणि कंबर बारीक कराची आहे तर या सर्वात चांगल्या एक्सरसाइज करून पहा.

लटकरणार्‍या पोटासाठी एक्सरसाइज

1 माऊंटेन क्लायंबर
2 क्रॉस क्लायंबर
3 हिल टॅप
4 सीझर एक्सरसाइज
5 स्ट्रेट लेग रेजस
6 पाइक स्लायडर

1 माऊंटेन क्लायंबर

* प्लँक पोझीशनमध्ये या.
* शरीर आणि हिप्स समान स्तरावर सरळ ठेवत, उजवा पाय वर उचला.
* उजवा गुडघा हातांमध्ये चेस्टकडे ढकला.
* जेव्हा उजवा पाय पूर्वस्थितीत आणाल, तेव्हा डाव्या पायासोबतही असेच करा.
* लवकर-लवकर आणि आळीपाळीने दोन्ही पायांनी करा.
* कोअर टाइट ठेवा आणि हिप्स खुप जास्त हलवू नका.
* 15 रॅप्सचे 3 सेट्स करा.

2 क्रॉस क्लायंबर

* ही एक्सरसाइज करण्यासाठी प्लँक पोझीशनमध्ये या.
* असे करताच शरीर आणि हिप्स एक लाइनमध्ये आणि कोर टाइट झाले पाहिजे.
* उजवा पाय डाव्या खांद्याकडे घेऊन जा.
* नंतर उजवा पाय सुरूवातीच्या पोझीशनमध्ये आणा.
* डाव्या पायासोबत असेच करा. दोन्ही पायांनी असेच सुरू ठेवा.
* 20 रॅप्सचे 3 सेट्समध्ये ही एक्सराइज करा.

3 हील टॅप

* पाठीवर झोपा.
* हात हिप्सच्या खाली ठेवा.
* गुडघे दुमडा आणि पाय एखाद्या स्टुलवर असावेत.
* पाय हळुहळु पुढच्या बाजूला तोपर्यंत झुकवा, जोपर्यंत कोपर जमीनीला स्पर्श करत नाही.
* पाय वर उचलण्यास मदत करण्यासाठी पोटाच्या मसल्स टाइट करा.
* 20 रॅप्सचे 3 सेट्स करा.

4 सीझर एक्सरसाइज

* डोक्याच्या पाठीमागे हात ठेवून पाठीवर झोपा.
* पाय, खांदे आणि डोके जमीनपासून वर उचला.
* पाय वरच्या दिशेने असायला हवेत.
* एक पाय आणखी वर आणि दुसरा खाली झुकवा.
* मानेवर जास्त प्रेशर देऊनका.
* 3 सेट्समध्ये प्रत्येक बाजूल 15 वेळा करा.

5 स्ट्रेट लेग रेजस

* पाठीवर झोपा.
* हात कण्याखाली ठेवा आणि कोर घट्ट आवळा.
* हळुहळु पाय वर उचला, ते 90 डिग्रीवर न्या.
* नंतर हळुहळु पाय पुन्हा जमीनीवर आणा.
* लक्षात ठेवा की, जर तुमच्या पाठीत वेदना होत असतील तर ही एक्सरसाइज करू नका.
* 20 रॅप्सचे 3 सेट्स करा.

6 पाइक स्लायडर

* यासाठी टॉवेल किंवा एखाद्या घसरणार्‍या वस्तूंची आवश्यकता असते.
* दोन्ही पाय स्लाइडवर आणि हात जमीनीवर ठेवा.
* पोटाचा खालील भाग टाइट करा आणि पायांना हाताकडे ओढा.
* हिप्स वरच्या बाजूला न्या आणि पुन्हा आपल्या पायांना हळुहळु पर्वस्थितीत आणा.
* हे सापे करण्यासाठी स्लाइडवाले माऊंटेन क्लायंबर करा.
* ही एक्सरसाइज 3 सेट्समध्ये 15 वेळा करा.