धुळे : दगडी शाळेत शिवकालीन किल्ल्यांचे प्रदर्शन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवक स्वराज्य ग्रुप तर्फे शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. त्यानिमीत्त दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दगडी शाळेत शिवकालीन किल्ल्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

शिवजयंतीनिमीत्त महाराजांच्या किल्ल्याचे प्रदर्शनाद्वारे त्या काळात असलेल्या किल्ल्यांचे वैभव आणि आत्ताची दुरावस्था याबाबत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

सदर प्रदर्शन फुलवाला चौक जवळील शासकिय विद्या निकेतन दगडी शाळेच्या ग्राऊंडवर आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनात धुळे शहरातील अनेक विद्यार्थी व नागरिकांनी आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन युवक स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष पुष्कर मगरे, जयेश घाडगे, वैभव पाटील, यश सोलंकी, विवेक पाटील, जितेंद्र पाटील, राधा नाईक, हर्षदा बोडके, वृषाली पाटील, सुमित पांडे, शुभम येलमामे, अनुज मराठे, सौरभ नाईक, कृष्णकांत पवार, गोपाल पाटील, मोनाक गुप्ता, अभिजीत मराठे,चैतन्य घड्याळजी, अजय पाटील, विजय पाटील तसेच सर्व सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.