छिंदम बंधूंसह 262 जण शहरातून हद्दपार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शहरातून २६२ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. 23 एप्रिलपर्यंत संबंधितांना शहरात वास्तव्य करता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी हा आदेश जारी केला आहे. यात बंधूंचाही समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम यालाही हद्दपार करण्यात आले आहे. तसेच त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यासह हद्दपार केले आहे. २३ एप्रिलपर्यत २६२ जणांना हद्दपार करण्यात आल्याचे प्रातांधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी सांगितले.

तोफखाना पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, कोतवाली पोलीस ठाणे व नगर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारांना हद्दपार करण्यात आले आहे. ५२ जणांना शहरात राहण्याची अटींवर मुभा देण्यात आली आहे.