Exit Poll 2019 : दक्षिण मुंबईत ‘मराठी टक्का’ अरविंद सावंतांना ‘साथ’ देणार की देवरांचा ‘हायप्रोफाईल’ प्रचार बाजी मारणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढाई आहे. २०१४ च्या निवडणुकीत जे उमेदवार आमनेसामने होते तेच पुन्हा यावेळी आहेत. शिवसेनेने अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. या चुरशीच्या लढाईत शिवसेनेचे अरविंद सावंत हे विजयी होतील असा अंदाज एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु झाला त्यावेळी काँग्रेसला दक्षिण मुंबई ही सुरक्षीत जागा असल्याचे वाटले होते. कारण २०१४ ला मोदी लाट होती तशी लाट यंदा नाही. त्यामुळे ही जागा आपण जिंकू असे काँग्रेसला वाटत होते. तसेच मिलिंद देवरा यांना उदय कोटक पासून मुकेश आंबानी या सारख्या उद्योजकांनी पाठिंबा दिला होता. याची चर्चा मतदारसंघात होती. विशेष म्हणजे या मतदारसंघात मिलींद देवरा यांनी मनसेसोबत व्यवस्थीत काम केले होते. त्यामुळे मनसे आपला मराठी मतदार मिलींद देवरांच्या पाठीशी ठामपणे उभा करेल असा अंदाज काँग्रेसला होता.

या मतदार संघातील जैन, गुजराती मारवाडी हे पारंपारीक मतदार नरेंद्र मोदींच्या पाठिशी आहेत. त्यामुळे मतदारांनी भाजपाच्या बाजूनं आपले मतदान केल्याचे पहायला मिळाले. मलबार हिल मतदारसंघातील मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त केले होते. आणि याच ठिकाणी सर्वात जास्त मतदान झाले होते. या ठिकाणी झालेले मतदान हेच अरविंद सावंत यांच्या विजयाचे प्रमुख कारण आहे. अरविंद सावंत यांच्या विजयी होण्यात मंगलप्रभात लोढा यांचा महत्वाचा रोल आहे.