Exit Poll 2019 : उत्‍तरप्रदेशामध्ये भाजप ‘कोमात’ तर सपा-बसपा ‘जोमात’ ; ‘बुवा-बबुवा’ची जोडी हिट तर भाजपचे मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान पदाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे म्हटले जाते. याच उत्तर प्रदेशचा एक्झिट पोल आला असून या ठिकाणी भाजपाला आपल्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर सपा बसपाने या ठिकाणी जोरदार मुसंडी मारल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यांवरून दिसून येत आहे.

युपीमध्ये ८० जगा आहेत. या ठिकाणी भाजपाला २२ जागा मिळतील तर सपा बसपाला ५६ जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर युपीएला २ जगांवर समाधान मानावे लागेल. २०१४ च्या निवडणूकीत भाजपाला ८० पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या तर बसपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. तर युपीएला दोन जागा मिळाल्या होत्या.

चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या मायावती यांचा पक्ष २००९ पासून पराभवाचा सामना करत आहेत. त्यांची प्रामुख्याने दलित मतांवर भिस्त आहे. २०१४ सालच्या निकालांची पुनरावृत्ती भाजपा करेल असे वाटत होते. मात्र यावेळी तसे होताना एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून दिसून येत नाही. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदा भाजपाच्या तब्बल ४९ जागा कमी होताना दिसत आहेत. तर सपा-बसपाने आघाडी केल्याने त्यांचा फायदा होत असून त्यांना गेल्यावेळी पेक्षा ५२ जागांचा फायदा होत आहे.