उत्‍तर मुंबईत उर्मिला मातोंडकरची ‘जादू’ निकामी ठरल्याने गोपाळ शेट्टी ‘कमळ’ फुलविणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये भाजपाचे गोपाळ शेट्टी यांचा पुन्हा विजय होईल असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. गोपाळ शेट्टी यांच्या विरुद्ध काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. गोपाळ शेट्टी यांनी २०१४ च्या निवडणुकीत तब्बल साडेचार लाखांचे मताधिक्य घेत विजयी झाले होते.

गोपाळ शेट्टी यांनी मागील वेळी मिळवलेल्या मताधिक्यामुळे या ठिकाणी कोणीच निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. गोपाळ शेट्टी यांचे मताधिक्य पाहून संजय निरुपम यांनी देखील ही जागा सोडली होती. कारण हे मताधिक्य कमी करणे कोणालाही शक्य नसल्याने या ठिकाणी कोणीच उभारण्यास तयार नव्हेते. म्हणूनच काँग्रेसने एक ग्लॅमरस चेहरा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. जो चेहरा घराघरात माहिती आहे असा उमेदवार काँग्रेसने या ठिकाणी दिला. काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली.

उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणची लढाई ही गुजाराती विरुद्ध मराठी होती. सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी युतीचे आमदार असल्याने या मतदारसंघात ध्रृवीयकरण होईल असा अंदाज काँग्रेसला होता. या ठिकाणी मराठी उमेदवाराला पसंती मिळेल असा अंदाज काँग्रेसला होता. मात्र असे झाले नाही. दहिसर, बोरवली या ठिकाणी गुजराती आणि मारवाडी समाज जास्त आहे. हा सर्व समाज गोपाळ शेट्टी यांच्या पाठिशी आहेत. यामुळे उर्मिला यांच्या पुढे डोंगरा एवढे मोठे आव्हान होते. कारण साडेचार लाखांचे मताधिक्य हे शक्य नाही.

काँग्रेसने उर्मीला मातोंडकर यांना या ठिकाणी उमेदवारी दिली हे चुकीचे होते. जर उर्मिला मातोंडकर यांच्या ऐवजी संजय निरूपम यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित चित्र वेगळे पहायला मिळाले असते. मात्र निरूपम यांना खात्री होती साडेचार लाखांचा मताधिक्य तोडणे शक्य नाही. त्यामुळेच त्यांनी ही जागा सोडली.