राज्याला लवकरच स्थिर सरकार प्राप्त होईल ही अपेक्षा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्रप्त होईल, अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो, असे भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जानादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे.

सरकारचे दैनंदिन कामाकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभिर्य़ाने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान आज आघाडीच्या बैठकीमध्ये शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आहे तसाच आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like