कोरोना व्हॅक्सीन आल्याने सर्व्हिस सेक्टरला मोठी आशा ! लाखो लोकांना मिळणार रोजगार आणि नव्या नोकर्‍या

नवी दिल्ली : कोरोना व्हॅक्सीन आल्यानंतर सर्व्हिस सेक्टर्समध्ये आशा निर्माण होऊ लागली आहे. कोरोना काळात सर्वात जास्त नुकसान याच सेक्टरचे झाले होते. हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍या लाखो लोकांची नोकरी गेली होती, परंतु आता किरकोळ क्षेत्रात विक्री वाढण्यासह रोजगाराच्या ( employment) जास्त संधी सुद्धा निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या सेक्टरचे योगदान 50 टक्केपेक्षा जास्त असते. या सेक्टरमध्ये उद्योगाबाबत भविष्यात अनेक आशा आहेत. जाणकारांनुसार, या सेक्टर्समध्ये जबरदस्त उसळी येणार आहे, ज्यामुळे देशाचा जीडीपी तर वाढेलच सोबतच लाखो तरूणांना रोजगार ( employment) सुद्धा मिळेल.

हॉटेल, पर्यटन आणि ट्रान्सपोर्ट सेक्टर्सच्या या आहेत आशा
चालू आर्थिक वर्षाच्या कोरोना काळात सुद्धा कृषीशी संबंधीत व्यवसाय, वीज उत्पादन आणि पुरवठा, जीएसटी कलेक्शन मागच्या वर्षाच्या तुलनेत चांगले आहे. हॉटेल, पर्यटन आणि ट्रान्सपोर्ट सेक्टरची सुद्धा स्थिती हळुहळु सुधारत आहे. हॉटेल व्यवसायिक प्रमोद सिंह म्हणाले, लसीकरण सुरू झाल्यानंतर सुद्धा लोक पुढील एक-दोन महिन्यापर्यंत घरातून बाहेर पडण्यास घाबरतील. मात्र, मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासून स्थितीमध्ये खुप सुधारणा होण्या सुरू होईल.

दूसरा डोस घेईपर्यंत लोक हॉटेलमध्ये थांबणार नाहीत, परंतु, दुसरा डोस घेण्याचा कालावधी संपताच लोकांमध्ये नवा विश्वास निर्माण होईल. आशा आहे की, मार्चपासून हॉटेल उद्योगाच्या व्यवसायत जबरदस्त उसळी येईल. यामुळे व्यवसाय वाढण्यासह नोकर्‍या सुद्धा मिळण्यास सुरूवात होईल. एका अंदाजानुसार, कोरोना काळात टूर-ट्रॅव्हल, हॉटेल-रेस्टॉरंट आणि एव्हिएशन सेक्टरमध्ये सुमारे 5 लाख लोकांच्या नोकर्‍या गेल्या होत्या. अशावेळी या सेक्टरमध्ये सुरुवातीच्या दिवसातच 5 लाखांपेक्षा सुद्धा जास्त लोकांना रोजगार मिळण्याची आशा आहे.

किरकोळ व्यापारात इतकी वाढ होऊ शकते
तर, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल म्हणाले, पुढील सहा महिन्यात कोरोनाच्या अगोदरची स्थिती होईल. लसीकरणाची सुरूवात होताच किरकोळ व्यापारात 25 ते 30 टक्के वाढ होईल. लोकांच्या मनातून आता कोरोनाची भिती निघून जाईल. लोक बाजारात बिनधास्त येतील. यामुळे ग्राहक दुकाने आणि मॉलमध्ये जाऊ लागतील. यामुळे देशात मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टरचा वेग सुद्धा वाढेल. कोरोना व्हायरसमुळे आर्थिक हालचालींना मोठा जो फटका बसला आहे त्याची रिकव्हरी आता लवकर वेग पकडणार आहे.

कॅटचे हे आहे म्हणणे
खंडेलवाल पुढे म्हणाले, सर्व्हिस सेक्टरला मिळणार्‍या ऑर्डर पाहाता ही आशा आहे की, पुढील काही महिन्यात या सेक्टरच्या व्यवहारात आणखी वाढ होईल. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच कर्मचारी कार्यालयांमध्ये परतल्यानंतर आता परिणाम स्पष्ट दिसत आहे. आता व्हॅक्सीन आल्यानंतर स्थितीत आणखी सुधारणा होईल. अलिकडच्याच दिवसात राज्यांमध्ये लॉकडाऊनशी संबंधीत प्रतिबंधात शिथिलता दिली जात आहे. यामुळे सप्लाय चेनमध्ये सुधारणा झाली आहे. याच कारणामुळे सर्व्हिस सेक्टरच्या पीएमआयमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.