सांगलीत हद्दपार गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. सुंदर आनंद केंगार (वय 44, गारपीर चौक) असे त्याचे नाव आहे.

हद्दपार केलेले गुन्हेगार या जिल्ह्यात फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी एलसीबीला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे पथक सांगली शहरात गस्त घालत होते. सुंदर केंगार याच्यावर मेमध्ये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तो परवानगीशिवाय सांगलीत फिरत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंतम खाडे, युवराज पाटील, उदय साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit : policenama.com