काय सांगता ! होय, ‘या’ घोड्याची किंमत 10 कोटी, धावतो एक्सप्रेस ट्रेन पेक्षाही ‘फास्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हा घोडा अनेक श्रीमंत लोकांचे स्वप्न असणार आहे कारण या घोड्याच्या किमतीमध्ये दोन बेंटले कंपनीच्या महागड्या कार येऊ शकतात. हा घोडा इतका प्रसिद्ध आहे की, दूरदूर वरून याला पाहण्यासाठी लोक येतात. हा घोडा महाराष्ट्रातील सारंगखेडा येथे सुरु असलेल्या चेतक महोत्सवात पहायला मिळाला.

‘शान’ नाव आहे या घोड्याचे
अगदी स्वतःला साजेल असे आणि रुबाब वाढेल असे असलेले ‘शान’ हे या घोड्याचे नाव आहे. याचे मालक असलेल्या तारा सिंह यांनी सांगितले की हा घोडा मारवाडी प्रजातीचा आहे. तारा सिंह हे पंजाबमधील अमृतसर येथे राहतात.

एका तासात जातो 70 किलोमीटर
तारा सिंह यांनी सांगितले की, शान सध्या देशामध्ये धावण्याबाबत चॅम्पियन आहे आणि तो एका एक्सप्रेस ट्रेनच्या गतीने धावतो. त्याचा वेग प्रती तास ७० किलोमीटर एवढा आहे.

शानची किंमत 10 कोटी रुपये
सारंगखेडा येथे आयोजित चेतक उत्सवामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा समवेत इतर राज्यांतील 500 पेक्षा अधिक घोड्यांची हजेरी लावली होती. परंतु यावेळी सर्वाधिक चर्चा ही शानची होती. यावेळी शानची किंमत 10 कोटी रुपयांपर्यंत लावण्यात आली.

पाच वर्षाच्या शानची उंची 5.5 फूट
शान पाच वर्षांचा आहे आणि त्याची उंची 5.5 फूट इतकी आहे, शान आतापर्यंत पाच वेळा शर्यतीमध्ये चॅम्पियन राहिलेला आहे. हा घोडा दोनदा मुक्तसर मेळ्यामधे, एकदा पटियालामध्ये, एकदा जोधपूरमध्ये आणि एकदा पुष्कर राजस्थानच्या मेळाव्यात चॅम्पियन राहिलेला आहे.

कसा आहे शानचा आहार
तारा सिंह ने सांगितले की, शानला रोज 100 ग्राम देसी तूप खायला घातले जाते. तसेच रोजच्या जेवणात शान चणे आणि धान्य खातो. याव्यतिरिक्त शानला रोज 500 रुपयांचा चारा लागतो

 

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/